खरा शिवसैनिक मातोश्रीचा आदेश डावलत नाही
नगरसेवक युवराज लोणारी : वरणगावात शिवसेनेची बैठक : आमदार संजय सावकारे यांना विजयी करण्यासाठी कामाला लागण्याचे केले आवाहन
भुसावळ : खरा शिवसैनिक मातोश्रीचा आदेश डावलत नाही, आदेश येताच तो युतीच्या उमेदवाराच्या कामाला लागतो त्यामुळे तालुक्यातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश मानून युतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांना विजयी करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी केले. वरणगाव शहरातील विठ्ठल मंदिरात शिवसेनेच्या बैठकीत लोणारी बोलत होते.
समन्वय ठेवून काम करा -कोलते
यावेळी प्रास्ताविक करतांना कोलते यांनी युतीचा आदेश असल्याने आम्ही कामाला लागलो असल्याचे सांगितले व महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांना आपण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले मात्र भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. नगरसेवक व उद्योजक मनोज बियाणी म्हणाले की, विधानसभेवर युतीचाच झेंडा फडकला पाहिजे, यासाठी शिवसैनिकांनी भाजपासोबत खांद्याला खांदा लावून काम करावे.



यांची होती बैठकीला उपस्थिती
बैठकीस शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख तथा नगरसेवक मनोज बियाणी, शिवसेना तालुका उपप्रमुख तथा माजी नगरसेवक पप्पू बारसे, शिवसेना माजी शहर प्रमुख तथा नगरसेवक मुकेश गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, अॅड.निर्मल दायमा, शिवसेना शहर प्रमुख बबलू बर्हाटे, वरणगाव येथील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संजीव कोलते, सुभाष चौधरी, रवी सुतार, महेंद्र शर्मा, शहर उपप्रमुख हर्षल पाटील, जिल्हा युवा अधिकारी चंद्रकात शर्मा, सुरज पाटील यांच्यासह बैठकीस सुनील भोई, अतुल शेटे, सुरज पाटील, चंद्रकांत शर्मा, दिगंबर चौधरी, संजीव सोनवणे, राम शेटे, प्रकाश मराठे, जितेंद्र देवघाटोळे, नितीन देशमुख, सुखदेव धनगर, नितीन मराठी, गौरव भोई, दिनेश भोई, विजय वंजारी, मनोज चौधरी, राजेश भोई आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
