जागतिक अपंग दिनानिमित्त यावलला अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप
यावल : यावल तहसील कार्यालयात जागतिक अपंग दिनानिमित्ताने तालुक्यातील अपंग कुटुंब प्रमुखांना पुरवठा विभागाच्या माध्यमातून अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप तहसीलदार महेश पवार यांच्याहस्ते करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावल तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमास गोपाळ भास्कर खाचणे, सुभाष आंनदा सोनवणे, पंडित वामन पाटील, शंकर गणपत खाचणे, जिजाबाई कडू सोनवणे, मीनाबाई नथ्थू बर्हाटे, जितेंद्र मुकंदा कपले, मनिषा गोपाळ खाचणे, पोपट हरी चौधरी, सोमेश संजय सोनवणे, दत्तात्रय भास्कर चौधरी, सतीश वसंत सोनवणे, गणेश सीताराम भारंबे, कल्पना प्रमोद चौधरी, सुहासनी गंगाधर चौधरी, हसन महारू तडवी, फारूकी जल्लालुदीन नसीरोद्दीन, संजय पंढरीनाथ वानखेडे, प्रभाकर सुखदेव सोनार, ललित प्रभाकर वाघुळदे आदी 32 अपंग बांधव व भगिनींना शासनाच्या अंत्योदय योजनेंतर्गत धान्य मिळण्याच्या उद्देशाने यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या प्रयत्नातून शिधापत्रिका वाटप करण्यात आली. या योजनेंतर्गत प्रत्येक शिधापत्रिका धारक लाभार्थ्यास 35 किलो धान्य मिळणार आहे. प्रसंगी यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन राजेश भंगाळे यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.


