शाई फेक प्रकरणानंतर शरद पवार म्हणाले ; अशा घटना घडणे चुकीचे


नाशिक : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पत्रकार गिदीश कुबर यांच्यावर शाही फेकण्यात आल्याचा प्रकारावर आपले मत व्यक्त केले असून लोकशाहीत अशा घटना घडणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे तसेच आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वीकारलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे पण मनाविरुद्ध लिहिल्यामुळे एखाद्यावर हल्ला करणे चुकीचे आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. काही नेत्यांनी या घटनेचा निषेध केलाय तर काही नेत्यांनी ही घटना निंदणीय असल्याचे म्हटले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !