भुसावळातील रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी
भुसावळ (10 मे 2026) : शहरातील रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये शुक्रवार, 9 मे रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शेडचे मुख्य विद्युत अभियंता चाणक्य जैन यांच्याहस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चाणक्य जैन यांनी महाराणा प्रताप यांच्या गौरवशाली जीवनावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या शौर्याचा वारसा जपण्याचे आवाहन केले. या सोहळ्याला विविध रेल्वे संघटनांचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी ललित भारंबे (सचिव,एनआरएमयू विद्युत शाखा), जयेश ढाकणे (सीआरएमएस), विशाल सपकाळे (एससीएसटी असोसिएशन), महेश राणे (ओबीसी असोसिएशन), ललित कुमार मुथा (मंडळ अध्यक्ष, रेल कामगार सेना), नागसेन यशोदे (एबीसी युनियन), राजू वानखेडे, महाराणा प्रताप जयंती समितीचे रणजित चौधरी, अमित राजपूत, दीपक पाटील, अमोलसिंग राजपूत, राहुल राजपूत, विष्णू सिंग, ललित चौधरी, यश राजपूत, आयुष सिंग, आशिष शिसोदिया, भूषणसिंग राजपूत, सुधीर कुमार, बाळू चौधरी, रिंकूकुमार सिंग, तरुण सिंग, नितीन परदेसी, रुपेश कुमार, अजय महाजन, राजेश खरे, विपीन कुमार, सुरेंद्र मीना, लक्ष्मणसिंग चौधरी, नयनसिंग राजपूत, अजय पाटील, बिंकू कुमार, राहुलसिंग राजपूत, संतोष सिंग, मयूर कोल्हे, दीपक बोराडे, मनोज सिंगले, राजीव सिंग, राजू जाधव, अविनाश सुरवाढे, रितेश पाटील, सुरेश मीना, दीपक सकपाळे, विजय ठाकूर, कमलेश सोनार, हरीश पाथराळ, चैतन्य धांडे, अक्षय महाजन, ईश्वर चव्हाण, सुमेध साळवे, विजय चौधरी यांच्यासह रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन चेतन तायडे तर उपस्थितांचे आभार रणजीत चौधरी यांनी मानले.


