एड्स रोगाचं जगात वाढणार प्रचंड प्रमाण अतिशय चिंताजनक : देवेंद्र पाटील
भुसावळ : जगात एड्स रुग्णांची वाढत जाणारी आकडेवारी अतिशय चिंताजनक असून या रोगाचा वायरस शरीरात पसरल्यानंतर तो शरीरावर कसा दुष्पपरीणाम करतो, त्याचे शरीरावर कसे विपरीत परिणाम होतात, हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे अतिशय समर्पक शब्दात प्रा.देवेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती करण्याच्या उद्देशाने भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस + 2 स्तर या विभागातर्फे कार्यसंस्कृती अभियाना अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले.
विद्यार्थ्यांशी साधला संवाद
याप्रसंगी राज्यशास्त्र परीषदेचे राज्य समन्वयक प्रा.शाम दुसाणे, पर्यावरण शिक्षण विभागप्रमुख प्रा.एम.एल.गोसावी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.उत्तम सुरवाडे होते. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय कुमार नाहाटा, प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. अतिथी म्हणून प्रख्यात डॉ.भागवत महाजन (जळगाव) उपस्थित होते.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
अतिथी म्हणून पर्यवेक्षिका शोभा तळेले कार्यक्रम अधिकारी डॉ.भाग्यश्री भंगाळे, समन्वयक प्रा.राजेंद्र खेडकर, प्रा.स्वाती पाटील, प्रा.टी.एस सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.भाग्यश्री भंगाळे तर सूत्रसंचालन प्रा.आर.पी.मसाणे यांनी तसेच आभार प्रा.महेश सरोदे यांनी मानले. प्रा.जे.डी.धांडे, प्रा.एच.बी.राजपूत, प्रा.व्ही.डी.सावकारे आदींनी परीश्रम घेतले.


