कौटुंबिक वादानंतर बेपत्ता झालेल्या किनगावच्या तरुणाचा विहिरीतच आढळला मृतदेह
यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथील तरूणाने कौटुंबिक वादातून बेपत्ता झाल्यानंतर मंगहवारी या तरूणाचा गावालगत शेतविहीरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तुषार गोपाळ राणे (32, रा.किनगाव, ता. यावल, जि.जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नेांद
किनगाव येथे रहिवासी तुषार राणे, आई आशा गोपाळ राणे आणि पत्नी रत्ना तुषार राणे हे वास्तव्याला आहे. तुषार राणे आणि त्याची पत्नी अशा राणे यांच्या कौंटुबिक वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. त्यामुळे तुषार हा तरूण गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. रविवारख 5 डिसेंबर रोजी तुषार व त्याची आई आशा यांनी सोबत जेवण करून झोपले. मध्यरात्री तुषार कुणाला काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाला. हा प्रकार सोमवार, 6 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. परीसरात तुषारचा शोध घेतला असता मिळून न आल्याने आई अशा राणे यांनी यावल पोलिसात धाव घेवून माहिती दिली. आशा राणे यांच्या खबरीवरून तुषार राणे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी तरूणाचा गावालगत शेतविहीरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


