संतापजनक ! : मुख्याध्यापकाने परीक्षेच्या बहाण्याने 17 विद्यार्थिनींचे केले लैंगिक शोषण
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये गुंगीचं औषध देत 17 मुलींचं लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने परीक्षेच्या बहाण्याने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. मुख्याध्यापकाने दहावीत असलेल्या 17 विद्यार्थिनींना प्रॅक्टिकल परीक्षेचा बहाणा करत शाळेतच थांबण्यास सांगितलं. यानंतर त्याने त्यांच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळलं आणि सहकार्यासोबत मिळून लैंगिक शोषण केलं आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत. योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुख्याध्यापकाने परीक्षेच्या बहाण्याने केला विद्यार्थिनींचा विनयभंग
तक्रारदार मुलीने दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक योगेश यांनी प्रॅक्टिरल परीक्षेच्या बहाण्याने आम्हा 16 ते 17 मुलींना बोलावून घेतलं. आम्हाला लिहायचं असल्याचं सांगत रात्री शाळेतच थांबण्यास सांगण्यात आलं. दुसर्या दिवशी अजून प्रॅक्टिकल असतील असं सांगण्यात आलं. यावेळी मुलींनी खिचडी बनवली असता ती नीट शिजली नसल्याचं मुख्याध्यापक म्हणाले. यानंतर त्यांनी स्वत: बनवली आणि आम्हाला खायला दिली. खिचडी खाताच आम्ही बेशुद्ध पडलो आणि त्यानंतर आमचा विनयभंग करण्यात आला.




आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथकं तयार
पोलिसांनी याप्रकरणी शाळेचा मुख्याध्यापक जिथे विद्यार्थिनी शिकतात आणि प्रॅक्टिकल परीक्षेच्या बहाण्याने ज्या शाळेत नेलं त्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. यामधील एकाला अटक करण्यात आली आहे. तर दुसर्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथकं तयार करण्यात आली आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करुन न घेणार्या अधिकार्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.