सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने अंध व अपंग बांधवांना किराणा वाटप
भुसावळ : सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधुन व स्नेहदी निराधार अंध आश्रमाचे वर्धापन दिनानिमित्त अंध व अपंग बांधवांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
या मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती
यावल रोडवरील तापी नदीकाठी असलेल्या श्री परशुराम व माता रेणुका देवी मंदिरात सोमवार, 6 डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून रूही जावळे, काजल जावळे, सुभाष पाटील, डॉ.खाचणे उपस्थित होते. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्नेहदीप निराधार अंध आश्रमातील 30 गरजु अपंग भगिनी व बांधवांना किराणा कीट वाटप करण्यात आले. प्रास्ताविक राजश्री नेवे यांनी केले. अध्यक्ष सुभाष पाटील, डॉ.खाचणे, जावळे यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी अध्यक्ष सुभाष पाटील, डॉ.खाचणे, उज्वला बागुल यांनी मनोगत व्यक्त केले. माया चौधरी, वंदना झांबरे, पत्रकार उज्वला बागुल, स्मिता माहुरकर, भाग्यश्री नेवे, मंदाकिनी केदारे, कामिनी नेवे, राजश्री बादशहा, मीना राजपूत, कविता महाले आदी महिला-भगिनी व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.


