रस्त्याचे काँक्रिटीकरण रखडले : नायगावात रस्ता रोको

बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन : पाच दिवसात रस्ता कामाचे सा.बां.विभागाचे आश्वासन


मुक्ताईनगर : तालुक्यातील नायगाव येथे राज्यमार्ग 30-54 अंतर्गत काँक्रिटीकरण रस्त्याचे काम सुरू करण्यात आले मात्र गेलया काही दिवसांपासून हे काम अपूर्णावस्थेत असल्याने होणारी गैरसोय लक्षात घेता बहुजन मुक्ती पार्टीतर्फे मंगळवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली होती. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी धाव घेत पाच दिवसात रस्ता कामाचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अर्धवट रस्त्यामुळे वाहनधारकांची कसरत
राज्यमार्ग 30-54 अंतर्गत काँक्रिटीकरण अपूर्ण असलेला रस्ता मुख्यत्वे रावेर, अंतुर्ली, मुक्ताईनगर या प्रमुख बाजारपेठांना जोडणारा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर कायम वर्दळ असते शिवाय या भागात केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या मालासाठी मोठ्या मालवाहू गाड्यांची आवक-जावक मोठ्या प्रमाणात असून शेतकर्‍यांच्या बैलगाड्या, ट्रॅक्टर आदींचा वापरही याच रस्त्यावरून आहे मात्र रस्ता एका साईडने अर्धवट तयार झाला असून त्याच बाजूने मोठ्या स्टील बाहेर काढुन ठेवल्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील काही दिवसात छोटे-मोठे अपघात होऊन लोकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. या रस्त्यावर मोठा अपघात होवू जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात लक्ष वेधण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे नायगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी पाच दिवसांच्या आत कामाला सुरुवात करण्याची आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा
पाच दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास बहुजन मुक्ती पार्टी रावेर लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. यावेळी बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा प्रभारी नितीन गाढे, अजय इंगळे, किरण पोहेकर, विठ्ठल पाटील, बापू महाजन, अतुल पाटील, मनोज पोहेकर, सचिन महाजन, संजय म्हसाणे, राजेश ढगे, राजू खवले, बंडू मराठे, राजू मराठे, भगवान कवरे, लखन बोदडे, एकनाथ प्रधान, तुषार कवळे, सचिन कवळे, राजेश पांडव, दिलीप मराठे, ईश्वर पोहेकर, दिलीप धनगर, संदीप धनगर च असंख्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !