बोराडीतील विद्यालयातील संगणकासह 55 हजाराचे साहित्य लंपास
शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या विद्यालयात संगणकसह अन्य 55 हजाराचे साहित्य चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना मंगळवार, 7 डिसेंबर रोजी उघडकीस आली. शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
चोरीमुळे उडाली खळबळ
शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे किसान विद्या प्रसारक संस्थेच्या अनेक शाळा आहेत. त्यात पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात सोमवार, 6 डिसेंबर रोजी रात्री चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कार्यालयातील संगणक, सीपीयू, दोन प्रिंटर,झेरॉक्स मशीन असा एकूण 55 हजाराचे साहित्य चोरी चोरून नेले. ही घटना मंगळवार, 7 रोजी सकाळी कर्मचारी नेहमीप्रमाणे शाळेत आले असता उघडकीस आली. या प्रकरणी विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.एम.कुळकर्णी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुध्द सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार फुलपगारे करीत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढलेले असतांना आता थेट शाळांमधील साहित्य चोरण्यापर्यंत चोरते पोहचले असल्याने चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीक करू लागले आहेत.


