पथराळे येथील 52 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या


यावल : तालुक्यातील पथराळे येथील एका 52 वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. गोपाळ सोनू धीवर (52) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. धीवर हे गावात पत्नी, मुलगा व सून यांच्यासोबत वास्तव्यास होते. बुधवारी त्याचीं पत्नी मुलगा, सून हे बाहेरगावी गेले होते व ते घरात एकटे असताना गळफास घेतला. दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांचा पुतण्याने त्यांच्या घराबाहेरून त्यांना आवाज दिला मात्र प्रतिसाद न आल्याने त्याने घरात जाऊन पाहिले असता गोपाळ धीवर हे गळफास घेऊन मृतावस्थेत आढळून आले. तातडीने याबाबत यावल पोलिसांना माहिती देऊन मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. डॉ.शुभम तिडके यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह नातलगांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार विजय पाचपोळ करीत आहेत. मयत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !