भुसावळातील गुंजाळ कॉलनीत पेव्हर ब्लॉकच्या कामाचा शुभारंभ
भुसावळ : शहरातील गुंजाळ कॉलनी भागात आमदार संजय सावकारे यांच्या विकास निधीतून पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ माजी ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र दत्तु आवटे यांच्या सूचनेनुसार नगरसेवक मुकेश गुंजाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी गुंजाळ यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. प्रसंगी संजय दत्तू आवटे, गौरव आवटे, किशोर टोके, राजेश चंदन, लाजरस मनी व जेष्ठ व स्थानिक नागरीक उपस्थित होते. स्थानिक जेष्ठ नागरीकांतर्फे माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या सहकार्यने हे काम होत असल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला.


