आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा भुसावळातील भोळे विद्यालयात सत्कार
भुसावळ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग (पुरुष) स्पर्धा नुकत्याच धनाजी नाना महाविद्यालयात झाल्या. या स्पर्धेत महाविद्यालयाकडून अनिल अशोक सपकाळे (वजन गट 51 ते 54), विवेक तायडे (वजन गट 57 ते 60), स्वप्नील तायडे (वजन गट 67 ते 71) यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत विजय संपादन केला. या खेळाडूंची विभागीय बॉक्सिंग स्पर्धा शिरपूरसाठी निवड झाली. यशप्राप्त खेळाडूंचा सिनेट व व्यवस्थापन परीषद सदस्य प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी सत्कार केला. यावेळी प्रा.डॉ.संजय डी.चौधरी, प्रा.अनिल सावळे उपस्थित होते.


