जननायक पार्टीच्या पदाधिकार्याचा विवाहित महिलेवर बलात्कार
नवी दिल्ली : जननायक पार्टीच्या पदाधिकार्याने विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना हरीयात उघड झाली आहे. नेत्याने अश्लील फोटो काढून जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. नेत्याने बलात्कार करुन आयुष्य उद्ध्वस्त केलं असा आरोप विवाहित महिलेने केला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरीयाणाच्या हिसारमध्ये एका महिलेने जननायक जनता पार्टीचा हिसार जिल्हाध्यक्ष रमेश गोदरा याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
फोटो व्हायरलची धमकी देत अत्याचार
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये सर्वप्रथम चंदीगड येथील एमएलए हॉस्टेवर बोलावून बलात्कार केला. त्यानंतर काही अश्लील फोटो देखील काढले. हे फोटो व्हायरल करण्यीच धमकी देऊन वारंवार बलात्कार केला. याच दरम्यान महिलेचं लग्न झालं. तिच्या लग्नानंतर देखील तिला त्रास दिला गेला. रमेश गोदरा हा जिल्हाध्यक्ष असून त्याने 2019 मध्ये जजपाच्या तिकिटावर आदमपूर विधानसभेतून निवडणूक लढवली होती. पण तेथे त्याचा पराभव झाला.




संधीचा फायदा घेत आरोपीने केला बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने सांगितलं की, ती जेव्हा 2017 मध्ये आजारी होती. तेव्हा रमेश गोदरा याने कालका येथील एका डॉक्टरकडे उपचार करण्याच्या बहाण्याने तिला चंदीगड येथे बोलावलं. चंदीगड येथे आल्यावर रमेश महिलेला घेऊन एमएलएम हॉस्टेलमध्ये गेला. आता रात्र झाली आहे आपण उद्या सकाळी ड़ॉक्टरांकडे जाऊ असं त्याने सांगितलं. त्यानंतर संधीचा फायदा घेत आरोपीने बलात्कार केला. यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.
जीवे मारण्याची दिली धमकी
पीडिता याबाबत तक्रार करण्यासाठी सर्वप्रथम आदमपूर पोलीस ठाण्यात गेली होती. तेव्हा पोलिसांनी तिला येथे गुन्हा झाला नसल्याने तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. यानंतर महिला पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात गेली तेव्हा पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतली. आरोपीने अनेकदा आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं देखील महिलेने सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.