भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर
प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम : प्रोटीन पावडरसह पौष्टीक आहाराचे वाटप
भुसावळ : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे वरणगाव येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. बालरोगतज्ज्ञ डॉ.अवनी ढाके यांनी यावेळी लहान मुलांची आरोग्य तपासणी करीत पालकांना मुलांच्या आरोग्यासंबंधी मार्गदर्शन केले. कमी वजनाची व अति तीव्र कमी वजनाच्या 44 मुलांना मंडळातर्फे आवश्यक असे प्रोटीन पावडर, कॅल्शीयम सिरप व इतर औषधांसोबत पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती वंदना उन्हाळे होत्या. व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष सुनील काळे, नगरसेवक गणेश धनगर, प्रशांत पाटील, अॅड.जंजाळे, जळगाव जिल्हा दुध संघ संचालिका श्यामल झांबरे, कठोरा सरपंच रोहिणी पाटील, नगरसेविका वैशाली देशमुख, मालती मेढे, भाग्यश्री धनगर, भाजपा शहराध्यक्षा प्रणिता पाटील, मंडळाच्या सचिव लता सोनवणे, श्रध्दा चौधरी, लक्ष्मी बावस्कर उपस्थित होत्या. प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले. बालविकास प्रकल्प अधिकारी रेखा गायकवाड यांनी मार्गदर्शन. पर्यवेक्षिका जयश्री जोशी-दवे यांनी आभार मानले. अनुपमा बोरीकर, संध्या रोझतकर, शोभा जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सहकार्य केले.


