ऐनपूरात दोन गट भिडले : तुफान दगडफेकीत आठ जण जखमी

पोलिसांची वेळीच धाव : गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त


रावेर : तालुक्यातील ऐनपूर येथे किरकोळ कारणावरुन एकाच समाजातील दोन गटात शाब्दीक वाद विकोपाला गेल्यानंतर दोन गट भिडले व तुफान दगडफेकीत आठ जण जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली. याबाबतची माहिती मिळताच निंभोरा पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत शांतता प्रस्थापीत केली.

तुफान दगडफेक
ऐनपूर येथील शेरा वाड्यात किरकोळ कारणावरुन रविवारी रात्री नऊच्या सुमारास एका समाजाच्या दोन गटामध्ये तुफान दगडफेक झाली. यात काही जण जखमी झाले असून दोन जणांना जबर मार लागल्याने त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले. निंभोरा पोलिस स्टेशनचे सहा.निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्यासह पोलिस कुमक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शांतता निर्माण करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !