सैनिकांच्या कुटुबियांना मोफत रुग्ण सेवा : रावेरातील डॉक्टरांचा अभिनव उपक्रम


रावेर : जीवाची बाजी लावत सीमेवर लढणार्‍या सैनिकांमुळे देश आज सुरक्षित असल्याने या सैनिकांसह त्यांच्या कुटुंबियांप्रती आत्मीयता तसेच देशसेवेचे कर्तव्य समजून रावेरात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.संदीप पाटील यांच्या हे मोफत उपचार करीत आहेत. डॉ.पाटील व त्यांच्या पत्नी डॉ.योगीता पाटील हे गेल्या वर्षभरापासून सैनिकांच्या पत्नी, बहिण किंवा मुलीला प्रसुतीपूर्व व प्रसूती पश्चात वैद्यकीय सेवा अगदी मोफत पुरवत आहेत . रुग्ण उपचारासठी रूग्णालयात दाखल झाल्यावर अव्वाच्या सव्वा रुपये बिल वसूल करणार्‍या डॉक्टरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा उपक्रम माऊली हॉस्पिटलचे डॉ. संदीप पाटील व त्यांच्या पत्नी डॉ.योगीता पाटील राबवून सैनिकांप्रती आदर व्यक्त केला आहे.

शंभरावर सैनिकांच्या नातेवाईकांवर उपचार
सैनिकाची पत्नी, मुलगी अथवा बहिणीचे आरोग्य विषयक उपचाराचे मोफत निदान व प्रसूती करणारे जिल्ह्यातील कदाचित पाटील हे एकमेव डॉक्टर असावेत. ते वर्षभरात किमान 100 सैनिकांच्या नातेवाईक महिला रुग्णांवर उपचार करतात. यात सैनिकांच्या पत्नीची नॉर्मल प्रसुती, सिझर, नियमीत आरोग्य तपासणी केली जाते.

सैनिक परीवाराच्या सेवेमुळे देशसेवेचा आनंद
प्रसुती काळात रुग्णाला मदतीची खुप गरज असते. त्यावेळी त्याला आपलेपणा, आधार मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सैनिकांच्या पत्नीची काळजी घेवून त्यांना हिम्मत व साथ देण्याचा प्रयत्न केला जातो. यातूनच देशसेवा केल्याचा आनंद मिळत असल्याचे स्त्रीरोग तज्ञ ड.ॉ संदीप पाटील यांनी सांगितले.

सैनिकांची सेवा ही देशसेवाच
सैनिक रात्रं-दिवस देशाच्या सीमेवर राहून देशाला सुरक्षित ठेवण्याचे काम करीत आहेत मात्र त्याचवेळी सैनिकांची पत्नी बहिण अथवा मुलगी प्रसुतीपूर्व व प्रसुती पश्चात उपचारासाठी स्त्री रोग तज्ज्ञांकडे जातात मात्र सैनिकांच्या कुटुंबातील या महिलांना अनेक वेळा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !