भरदिवसा दरोडेखोरांनी व्यापार्याकडील 35 लाखांची रोकड लुटली
मुंबई : व्यापार्याची कार अडवून त्याच्याकडील 35 लाख दरोडेखोरांनी लुटले. ही घटना कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दरोडा टाकल्यानंतर आरोपींपैकी एक मालाडच्या दिशेने तर, दुसरा कांदिवलीच्या दिशेने पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे अतिरी पोलीस आयुक्तांसह डीसीपीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संदीप गुजर असे लुटण्यात आलेल्या व्यापार्याचे नाव आहे.
दुचाकीस्वारांनी केली लूट
संदीप हे मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या पांढर्या रंगाच्या फॉर्च्युनर कारमधून मालाडकडे निघाले असता टाईम्स ऑफ इंडिया ब्रीज समोरून त्यांची कार मीरा रोडच्या दिशेने येताच दुचाकीस्वारांनी त्यांना अपघात झाल्याचं सांगून त्यांची कार थांबवली. व्यापार्यानं कार थांबवली असता एका व्यक्तीन संदीपची कॉलर पकडली आणि त्यांना खेचून कारमधून बाहेर काढलें तर कारच्या दुसर्या बाजूला उभा असलेल्या दुसर्या व्यक्तीनं कारची काच फोडली. तसेच कारमध्ये ठेवलेली बॅग घेऊन पळ काढला. या बॅगेत 35 लाख रुपये होतो, अशी माहिती व्यापार्यानं पोलिसांना दिली.







