आमदार संजय सावकारेदेखील आमचेच ! : नाथाभाऊंच्या वक्तव्याने उडवली भुसावळात धमाल


भुसावळ : माजी मंत्री संजय सावकारे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अलीकडेच खडसेंनी सावकारेंना केक भरवल्यानंतरच्या कार्यक्रमात चर्चेत आल्या मात्र आपण भाजपा कदापि सोडणार नाही, अशी भूमिका सावकारे यांनी यापूर्वी व त्यानंतर मांडत आपण भाजपाशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले आहे मात्र आज भुसावळात विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात माजी मंत्री खडसेंनी आमदार संजय सावकारेदेखील ‘आमचेच असल्याचे’ वक्तव्य करून पुन्हा खळबळ उडवून दिली. ते म्हणाले की, पालिकेची मुदत 25 डिसेंबर रोजी संपत असलीतरी आमदारांची टर्म बाकी असल्याने त्यांनी दोन कोटींचा निधी पालिकेला विकासकामांसाठी द्यावा, असे सांगताच आमदारांनी पालिकेला तीन कोटींचा निधी यापूर्वीच दिल्याचे व्यासपीठावरच खडसेंना सांगितले.

खडसे म्हणाले ; अस्वच्छतेतून शहर सावरले नाही
माजी मंत्री खडसे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपूर्वी स्थिती काय होती हे मी सांगणार नाही कारण भुसावळकरांनी ते अनुभवले आहे. आता रस्त्यांची कामे सुरू आहेत, स्वच्छता होत आहे मात्र अस्वच्छतेतून शहर अद्याप सावरले नसल्याची कबुली त्यांनी दिली. घरकुलांचा प्रस्ताव प्रलंबित असून त्यास मंजुरी मिळावी तसेच अमृतच्या विस्तारीत योजनेला प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



आमदार संजय सावकारे म्हणाले ; अजित दादा, पुन्हा-पुन्हा भुसावळात या !

यांची व्यासपीठावर उपस्थिती
पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार अनिल भाईदास पाटील (अमळनेर), लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा निमंत्रक अविनाश आदिक, नगरसेवक मुकेश पाटील, अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्रा.दिनेश राठी, अमोल इंगळे, किरण कोलते, प्रमोद नेमाडे, लक्ष्मी मकासरे, शैलजा नारखेडे, पिंटू ठाकूर, सविता अहिरे, पूजा सूर्यवंशी, माजी नगरसेवक वसंत पाटील, दिनेश नेमाडे, शफी पहेलवान, शरीफ ठेकेदार, पुरूत्तोत्तम नारखेडे, सतीश सपकाळे, अजय नागराणी तसेच जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !