दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार मात्र तरीही शहरात वास्तव : आरोपीला अटक
जळगाव : जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार असताना शहरात वास्तव्य करीत असलेल्या आरोपीला शहर पोलिसांनी अटक करीत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हद्दपार आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप मधुकर निकम (25, रा.गेंदालाल मिल, जळगाव) याच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी 26 जुन 2021 रोजी पुढील दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून आरोपी संदीप निकम याला हद्दपार केले होते.न आरोपी संदीप निकम हा जळगाव शहरातील जुने बसस्थानक परीसरात असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांना मिळाली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे पथकाने आरोपी संदीप मधुकर निकम याला जुने बसस्थानक परीसरातून सायंकाळी सात वाजता अटक केली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रफिक पटेल यांच्या फिर्यादीवरून हद्दपार आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.





