पळासखेडे येथून पशूधनाची चोरी


भडगाव : तालुक्यातील पळासखेडे येथील एका शेतकर्‍याची 32 हजार रुपये किमतीची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्ली. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पशूधन चोरीमुळे घबराट
अजय रामदास भवरे (27, रा.पळासखेडे, ता.भडगाव) हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. जोडधंदा म्हणून त्यांच्याकडे गाई आहेत. त्यांच्या खळवाडीतील गोठ्यातून अज्ञात व्यक्तीने शुक्रवार, 16 डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची 32 हजार रुपये किंमतीची गावरान जातीची गाय चोरून नेली. याप्रकरणी अजय भवरे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक मनोज माळी करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !