भडगाव तालुका पत्रकार संघ उपाध्यक्षपदी भास्कर पाटील बिनविरोध
महिंदळे, ता.भडगाव : महाराष्ट्र पत्रकार संघ संचलित भडगाव तालुका पत्रकार संघाची बैठक शनिवारी भडगावातील शासकीय विश्राम गृहात झाली. या बैठकीत पुढील दोन वर्षांची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. भडगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सागर शिवदास महाजन तर कार्याध्यक्षपदी नरेंद्र रमेश पाटील यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष भास्कर शेंनफडू पाटील, सचिव शेख जावेद शेख सत्तार, सहसचिव गणेश शिवराम अहिरे, कायदेविषयक सल्लागार भरत रमेश ठाकरे, प्रसिध्दी प्रमुख धनराज भिकन पाटील, सदस्य रमेश विरभान धनगर, सदस्य नितीन कन्हैय्यालाल महाजन, सल्लागार विठ्ठल कौतीक पाटील, सल्लागार परमेश्वर मोरे, सल्लागार प्रा.सुरेश कोळी यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीला राज्य कार्यकारणी सदस्य सुनील पाटील, सोमनाथ पाटील, संजय पवार, सुधाकर पाटील, सुनील कासार, अशोक परदेशी, पुरुषोत्तम सोनवणे,राजू शेख, राकेश पाटील, संजय पाटील राजू दीक्षित आदींची उपस्थिती होती.
