भुसावळात आज आमदार सावकारेंच्या प्रचारार्थ नाथाभाऊंची जाहीर सभा


माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या भाषणाकडे लागले शहरवासीयांचे लक्ष

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना रीपाई, रासप व शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय वामन सावकारे यांच्या प्रचारानिमित्त माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची जाहीर सभा आज, बुधवार, 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता नेहरू मैदानावर होत आहे. सभेत नाथाभाऊ नेमके काय बोलतात? याची शहरवासीयांना उत्सुकता लागली आहे. महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची जाहीर सभा नेहरू मैदानावरील प्रांगणात बुधवारी सायंकाळी सात वाजता होत आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रीपाई, रासप व शिवसंग्राम महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस डॉ. प्रा. सुनील नेवे यांनी केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !