चाळीसगाव स्टेशनरोड परीसरातून दुचाकीची चोरी


चाळीसगाव : शहरातील स्टेशन रोडवरील एका लॉजच्या समोरून वृध्दाची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या
सर्जेराव भीमराव पाटील (59, रा.भडगाव, जि.जळगाव) हे कामाच्या निमित्ताने शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता दुचाकी (क्रमांक एम.एच.19 सीएस 5978) ने चाळीसगावातील रेल्वे स्टेशन जवळील सुभाष लॉज येथे आले. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्क केली व रात्री आठ वाजता घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना दुचाकी जागेवर आढळली नाही. या प्रकरणी शनिवारी सायंकाळी सहा वाजता चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक दीपक पाटील करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !