जळगावातील डी-मार्ट परीसरातून एकाची दुचाकी लांबविली
जळगाव : शहरातील डी.मार्ट परीसरात पार्क केलेली तरुणाची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरात दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
रवींद्र लोटन न्हावी (34, रा.जिजाऊ नगर, वाघ नगरजवळ) हे सलुन दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवार, 13 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते 11 वाजेच्या दरम्यान शहरातील डीमार्ट येथे काही वस्तू खरेदी करण्यासाठी दुचाकी (एम.एच.19 ए.एच6999) ने गेले असता दुचाकी डीमार्ट परीसरात पार्क केली. खरेदी करून परत आल्यानंतर दुचाकी जागेवर आढळली नाही. दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली मिळाली नाही. याप्रकरणी रवींद्र न्हावी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. रवींद्र न्हावी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक चंद्रकांत पाटील करीत आहे.





