देश विघातक संघटनेवर भारतात बंदी घाला : हिंदू जनजागृती समितीची मागणी
यावल : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देश विघातक संघटनेवर भारतात बंदी घालण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच यावलचे नायब तहसीलदार आर.डी. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावल तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, 2006 मध्ये केरळ येथे स्थापन झालेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचे जाळे आता देशभरात पसरले आहे. ही संघटना अत्यंत जहाल असून अनेक देशविघातक आणि समाजविघातक कार्यात गुंतलेली असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. ही संघटना देशातील धार्मिक सलोखा आणि सामाजिक शांतता यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे निवेदनात नमूद आहे.
या पदाधिकार्यांनी दिले निवेदन
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि तिच्याशी संबंधित सर्व संलग्न संघटनांवर तत्काळ बंदी आणावी व देशाची सुरक्षितता आणि धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी मागण्यांची दखल घ्यावी, अशी अपेक्षा जळगाव जिल्हा व यावल तालुका हिंदू जनजागृती समितीतर्फे प्रशांत जुवेकर, धीरज भोळे आदी सदस्यांनी केली आहे.


