राजधानी एक्स्प्रेसखाली आल्याने तरुणाचा मृत्यू : चाळीसगावातील घटना


चाळीसगाव : रेल्वे लाईन ओलांडत असताना अचानक रेल्वेच्या जोरदार धडकेत अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेने मृत्यू
चाळीसगाव शहरातील रेल्वे स्थानकावरील किमी नं. 327/1 ते 327/9 च्या दरम्यान रेल्वे लाईन ओलांडत असताना अचानक डाऊन राजधानी एक्सप्रेस (गाडी क्र. 22221) च्या धडकेत 30 ते 35 वर्षीय अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 18 रोजी 8.15 वाजेच्या पूर्वी घडली. दरम्यान घटना घडताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल कला. मयताच्या उजव्या हातावर ‘सचिन’ नाव असे गोंदलेले आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सुरेश महाजन हे करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !