रावेरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा दुधाने अभिषेक
रावेर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई फेकल्याची घटना कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु येथे घडल्यानंतर देशभरात संताप व्यक्त होत असतानाच रावेरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रावेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा दुधाने अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांचा जयघोष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रावेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक करण्यात आला. यावेळी जयघोष देऊन दुधाने अभिषेक करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, राष्ट्रावादी शहराध्यक्ष महेमूद शेख, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, मराठा समाजाचे सचिव श्रीराम पाटील, अखिल भारतीय मराठा समाजाचे सदस्य संतोष महाजन, भूषण महाजन, किरण महाजन, महेश राऊत, सचिन पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


