यु ट्यूबवरील व्हिडिओ पाहून त्याने केली 15 कोटींची चोरी मात्र घडले असे काही…..
नवी दिल्ली : यु ट्यूबवरील व्हिडिओ पाहून चोरट्याने दहा कोटींच्या सोन्यासह पाच कोटींच्या हिर्याची चोरी केली मात्र पाच दिवसांच्या कठोर मेहनतीनंतर वेल्लोरमध्ये ज्वेलरी दुकान लुटणार्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. तिखाराम (22) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 15 डिसेंबरला अलुक्कास ज्वेलरी शॉपमध्ये लूट झाल्याची सूचना मिळाली होती. 15 किलो सोन्याचे दागिने चोरी गेले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती चेहर्यावर मुखवटा लावून दिसला होता. तो स्प्रे पेंटचा वापर करून सीसीटीव्ही कॅमेर्याचे रेकॉर्डींग रोखण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यानंतर त्याने ही चोरी केली.




चोरीची ट्रीक पाहून पोलिसही चक्रावले
जसे की, कुणीही अलार्म का वाजवू शकलं नाही? कुणालाही काही संशयास्पद काहीच कसं आढळलं नाही? पोलिसांनी साधारण 200 सीसीटीव्ही रेकॉर्डींग पाहिले. सोमवारी पोलिसांना त्यांच्या पाच दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळालं. आरोपी कुचिपलयम गावातील 22 वर्षीय तीखाराम आहे. चौकशीतून जे समोर आलं ते पाहून पोलिसही हैराण झाले. तिखारामने यू ट्यूब व्हिडीओ बघून चोरीचा प्लान केला होता. प्रारंभिक चौकशीतून समोर आलं की, तिखारामने ज्वेलरी दुकानाच्या भिंतीला छिद्र पाडण्यासाठी 10 दिवसांचा वेळ घेतला. जेणेकरून कोणताही आवाज होऊ नये.
स्मशानात लपवल्या मशीन्स
आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी आणि सीसीटीव्ही ब्लॉक करण्याची आयडिया यू ट्यूबवर पाहिली. तिखारामने सोनं वितळवण्यासाठी काही मशीन्सही विकत घेतल्या होत्या. त्या त्याने ओडुकाथुर स्मशानात लपवल्या होत्या. मात्र, इतकं सगळं करूनही तीखाराम पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच. त्याला लवकर श्रीमंत व्हायचं होतं म्हणून त्याने ही चोरी केली. त्याच्याकडून पोलिसांनी 10 कोटी रुपये किंमतीं सोने आणि काही हिरे ताब्यात घेतले.