भुसावळातील अनोळखीचा मृत्यू : ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन


भुसावळ : शहरातील बसस्थानकाजवळील हिकरणी कक्षाजवळ 55 ते 60 वर्षीय भिकार्‍याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अनोळखी इसमाच्या वारसांचा शोध अद्याप लागला नसल्याने ओळख पटवण्याचे आवाहन बाजारपेठ पोलिसांनी केले आहे. 1 डिसेंबर रोजी 9.30 वाजेपूर्वी अनोळखीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुरक्षा रक्षक एकनाथ ठाकूर यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अनोळखीबाबत ओळख पटत असल्यास वारसांनी तपासी अंमलदार पोलिस नाईक यासीन सत्तार पिंजारी (7020309469) संपर्क साधावा, असे आवाहन बाजारपेठ पोलिसांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !