धक्कादायक ! : देशभरात 24 तासात ओमायक्रॉनचे 84 रुग्ण आढळले


नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांमध्ये 84 नवीन ओमायक्रॉन संक्रमित समोर आल्याने सरकारची पुन्हा चिंता वाढली आहे. एका दिवसात आढळलेल्या संक्रमितांची ही सर्वात जास्त संख्या आहे. देशात आतापर्यंत आढळलेल्या एकूण ओमायक्रॉन संक्रमितांचा आकडा 360 वर पोहोचला आहे. मंगळवारी देशात 44 नवीन ओमायक्रॉन संक्रमित आढळले होते. तामिळनाडूमध्ये गुरुवारी सर्वात जास्त 33 नवे ओमायक्रॉन रुग्ण आढळले होते. महाराष्ट्रात 23 आणि कर्नाटकात 12 प्रकरणे नोंदवण्यात आली.

सरकार जारी करणार निर्देश
देशात ओमायक्रॉन आणि कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता आरोग्य मंत्रालय आज पत्रकार परीषद घेणार आहे. दुपारी चार वाजता होणार्‍या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये कोरोनापासून बचावाविषयी सरकारचे निर्णय आणि तयारींची माहिती दिली जाईल. देशभरात होत असलेल्या लसीकरणाचीही माहिती दिली जाईल.





महाराष्ट्रात नाईट कर्फ्यूची शक्यता
राज्यात ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता राज्य सरकार आजपासून नवीन निर्बंध लावू शकते. याचा निर्णय गुरुवारी रात्री उशीरापर्यंत चाललेल्या कोविड टास्क फोर्स बैठकीमध्ये झाला. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून सामिल झाले होते. आज संध्याकाळपर्यंत अनेक नवीन गाईड लाईन जारी होतील. महाराष्ट्र सरकार ख्रिसमस आणि नवीन वर्षादरम्यान होणार्‍या गर्दीमुळे चिंतेतत आहे. यासाठी राज्य सरकार विस्तृत दिशानिर्देश जारी करु शकते. यामध्ये नाइट कर्फ्यू, हॉटेलमध्ये मर्यादिसत संख्येसोबत पार्टीज आणि कामाच्या ठिकाणी गर्दीविषयी गाइडलाइन जारी केल्या जातील.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !