भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी निर्मित पिनाका पॉडची पोखरणमध्ये चाचणी यशस्वी

38 किलोमीटर मारक क्षमता : यशस्वी चाचणीमुळे कर्मचार्‍यात आनंद


भुसावळ : सैन्यासाठी लागणारे शस्त्रास्त्र व दारूगोळा पॅकेजिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या भुसावळातील ऑर्डनन्स फॅक्टरीत पिनाका रॉकेट पॉड एमके- 1 चे काम गेल्या 2014 पासून यशस्वीपणे बनवत आहे तर अलिकडेच 38 किलोमीटर मारक क्षमता असलेला व शत्रूचे मोठे नुकसान करणारे पिनाका रॉकेट पॉडचा नवीन प्रकार डीपीआयसीएम (एडीएम) (DPICM) (ADM) तयार करण्यात करून चंद्रपूर येथे पाठवण्यात आला व नुकतीच त्याची पोखरणमध्ये गुरुवार, 9 रोजी यशस्वी चाचणी झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये आनंद पसरला आहे.

रॉकेट फायरसाठी पॉडचा वापर
भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीने डीपीआयसीएम (एडीएम) वारहेड पिनाका रॉकेटसाठी पॉड (Pinaka Roket Pod) तयार केला आहे तर हा पॉड एआरडीई, पुणे (डीआरडीओ) (DRDO )
ने विकसीत केला आहे. पॉडचा वापर रॉकेट उडवण्यासाठी केला जातो. ही ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.
या पिनाका रॉकेट पॉडच्या यशस्वी चाचणीने आयुध निर्माणी भुसावळचे अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये आनंद पसरला आहे. भुसावळ ऑर्डनन्सचे महाव्यवस्थापक
वसंत निमजे यांच्या नेतृत्वाखाली हा पॉड तयार करण्यात आला. त्यांनी या यशस्वी चाचणीबद्दल सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे.





लवकरच अत्याधूनिक गाईडेड पिनाका पॉड
भुसावळ ऑर्डनन्समध्ये लवकरच अत्याधूनिक गाईडेड पिनाका रॉकेट पॉड तयार करण्यात येणार असून त्याची मारक क्षमता (रेंज) 75 किलोमीटर आहे. त्यास मार्गदर्शक कीट बसवण्यात येणार असल्याने शत्रूंच्या अचूक ठिकाणावर त्या माध्यमातून निशाणा साधणे सोपे होणार असल्याची माहिती भुसावळ ऑर्डनन्सचे (Bhusawal Ordnance Factory) पीआरओ बी.देवीचंद यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !