स्व.स्वप्नील ललवाणी यांचा वाढदिवस कुटुंबाने ठरवला संस्मरणीय

भुसावळातील महाविद्यालयांना ‘घरट्यातून आकाशाकडे’ पुस्तक भेट


भुसावळ :l शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.डी.एम. ललवाणी यांचे कनिष्ठ सुपुत्र स्वप्नीलचे एका वर्षापूर्वी निधन झाले. स्व.स्वप्नील याचा वाढदिवस संस्मरणीय ठरण्यासाठी प्रा.डॉ. ललवाणी यांनी स्वलिखीत ‘घरट्यातून आकाशाकडे’ या पुस्तकाचे वाटप शहरातील विविध महाविद्यालयांना करण्यात आले. हे पुस्तक स्व.स्वप्नीलला अर्पण करण्यात आले आहे.

प्राचार्यांना दिली पुस्तकाची प्रत भेट
स्व.स्वप्नीलच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भुसावळातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालय, दे.ना.भोळे महाविद्यालय, के.नारखेडे महाविद्यालय, डी.एल.हिंदी महाविद्यालय तसेच भुसावळ हायस्कूल, डी.एस.हायस्कूल, के.नारखेडे विद्यालय, सु.ग.टेमाणी विद्यालय, डी.एल.हिंदी विद्यालय या विद्यालयात त्यांनी त्या पुस्तकांच्या प्रती व दीपावली अंक प्रत्यक्षपणे जाऊन विनयतेने प्राचार्यांना सादर केल्या. प्राचार्य एम.व्ही.वायकोळे, प्राचार्य आर.पी.फालक, प्राचार्य रमेश जोशी, उपप्राचार्य श्रीवास, मुख्याध्यापक प्रा.मनोज माहेश्वरी, प्रा.प्रमोद शुक्ला, प्रा.एम.टी सपकाळे, प्रा.साहानी, प्रा.एन.बी.किरंगे आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी नलीन ललवाणी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !