पतीचे अपहरण करून हत्येसह विवाहितेची बलात्काराची तक्रार मात्र पतीच प्रकटताच उडाली खळबळ


नवी दिल्ली : पतीचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली व आपल्यावरही बलात्कार झाल्याची तक्रार विवाहितेने दिल्यानंतर संशयीत आरोपींचा मागे पोलिसांचा ससेमिरा सुरू झाला मात्र नातेवाईकांनी रेकी करीत खून झालेल्या इसमालाच शोधून काढल्यानंतर पोलिसही अवाक झाले. हा प्रकार नेमका नातेवाईकांना त्रास देण्यासाठी करण्यात आली की अन्य कारणासाठी याचा आता शोध सुरू करण्यात आला आहे. बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात घडलेल्या घटनेबाबत एका वेबसाईटने वृत्त दिले आहे.

विवाहितेने केला बलात्कारासह पतीच्या हत्योचा आरोप
मधेपुराच्या सिंहेश्वर पोलीस ठाण्यातील हे प्रकरण आहे. जिथे मृत पतीची पत्नी रीना देवी हिने आपला पती सुधीर सिंह याची हत्या आणि अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. रीना देवी यांनी पोलिस तक्रारीत पाच जणांची नावे दिली होती. रीना देवी यांनी आरोप केला होता की, तिच्यावर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पतीचे अपहरण करून त्याची हत्या केली. रीनाने न्यायासाठी पोलिसांसह आरोपींच्या अटकेसाठी मोठ्या लोकांकडे विनवणी सुरू केली. कुटुंबीयांवर पतीच्या हत्येचा आरोप केल्यानंतर रीना देवी यांनी पीएमओ, एसपी आणि डीजीपी यांना पत्र लिहून त्यांच्या अटकेची विनंती केली होती.





अखेर नातेवाईकांनीच शोधले मृत पतीला 
तक्रारीनंतर सिंहेश्वर पोलीस ठाण्यात आरोपीच्या नातेवाईकांना सतत त्रास दिला जात होता. त्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी मृत सुधीर सिंहचा शोध सुरू केला. नातेवाईकांनी सुधीर सिंहचा नेपाळपर्यंत शोध घेतला, मात्र काहीही मिळाले नाही. रीना देवीच्या कटात चारही बाजूंनी घेरलेल्या आरोपीच्या नातेवाईकांनी सुधीर सिंहचा नव्याने शोध सुरू केला. प्रत्येक गल्ली, भागात आणि परिसरात सुधीर सिंह यांचे फोटो लावले. अचानक आरोपीच्या नातेवाईकांना माहिती मिळाली की मृत सुधीर सिंह हा त्याच्या सासर्‍यांसोबत ख्रिश्चन मिशन रुग्णालयात दाखल आहे आणि तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पती- पत्नीने रचला होता भयंकर कट
आरोपीच्या नातेवाईकांनी अनेक दिवस सुधीर सिंहची रेकी केली आणि त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणाचे तपास अधिकारी आयओ उमेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित आरोपी अचानक ख्रिश्चन मिशन रुग्णालयात पोहोचले. तिथे त्यांना सुधीर सिंह पूर्णपणे तंदुरुस्त आणि जिवंत दिसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोप करणार्‍या रीना देवी यांची चौकशी केली. या कटामागील हेतू केवळ गोवण्याचा होता की आणखी काही होता, या संपूर्ण प्रकरणाचा पोलिस पुन्हा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !