मेहरूणमधील गोडाऊनला भीषण आग
जळगाव : शहरातील मेहरूण परीसरातील बंद गोदामाला रविवारी राी अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीने रुद्र रूप धारण केले. जळगाव अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळाले.
अचानक लागली आग
शहरातील मेहरूण परीसरातील महादेव मंदिराच्या परिसरात असलेल्या गोदामाला रविवारी रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली. काही मिनिटांमध्येच आगीचे लोळ उठत असल्याचे पाहून परीसरातील नागरिकांनी तातडीने अग्नीशामन दलास पाचारण केले. महापालिकेच्या फायर फायटर कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास प्रारंभ केला. या आगीत नेमके किती रूपयांचे नुकसान झाले याची माहिती देखील समोर आलेली नाही.




यांनी आग आणली आटोक्यात
अग्निशमन दलाचे वाहन चालक संतोष तायडे, जगदीश साळुंखे, सरदार पाटील, गोलानी मुख्यालय वाहन चालक नासीर अली, रोहिदास चौधरी, पन्नालाल सोनवणे, राजेंद्र चौधरी, परमेश्वर सोनवणे, निवांत इंगळे, वाहन चालक सोपान जाधव, राजमल पाटील, प्रकाश कुमावत, मदन जराळ, प्रकाश सपकाळे, नितीन बारी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परीश्रम घेतले.
