रोझोद्यातील तरुणाची आत्महत्या


रावेर : तालुक्यातील रोझोदा येथील 39 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार, 26 रोजी दुारी दिड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

सावदा पोलिसात नोंद
सावदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन फेगडे हा रोझोदा, ता.रावेर येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरात घरातील वरच्या मजल्यावर दोरीने गळफास घेतला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. नातेवाईक घरी आल्यावर हा प्रकार उघउकीस आला. या प्रकरणी धनराज पाटील यांच्या खबरीवरून सावदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार विजय पोहेकर करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !