पंधराशे रुपयांची लाच भोवली : लाचखोर पोलिस नाईक एसीबीच्या जाळ्यात


 

ठाणे : वागळे इस्टेट पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक मिलिंद गणेश जोशी यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंधराशे रुपयांची लाच स्वीकारताच अटक केली. ही कारवाई सोमवार, 27 रोजी दुपारी दीडच्या सुमारास करण्यात आली. जामीन मिळवण्यासाठी तपास अधिकार्‍याचा से आणून तो कोर्टात जमा करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.





या कारणास्तव मागितली लाच
52 वर्षीय तक्रारदाराच्या मुलावर वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यास अटक करण्यात आली आहे. मुलाचा जामीन करण्यासाठी तपास अधिकार्‍याचा से आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी कोर्ट कारकून मिलिंद जोशी यांच्याकडे तपास अधिकार्‍याचा से आणून कोर्टात जमा करण्यास सांगितले. त्यावेळी मिलिंद जोशी याने तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये दीड हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. पडताळणीनंतर सोमवारी दुपारी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना जोशी यांना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !