48 हजाराची रोकड लांबविली : पाचोर्‍यातील घटना


पाचोरा : शहरातील आशीर्वाद रेसिडेन्सी येथील एका घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी कपाटातील 48 हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
शहरातील आशीर्वाद रेसिडेन्सीतील सुचिता सुभाष सुर्यवंशी (69) या काही कामानिमित्त घराबाहेर असताना चोरट्यांनी कपाटातील 48 हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी सुचिता सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दीपक सुरवाडे करीत आहे.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !