पेट्रोल टाकून दोन दुचाकी जाळल्या
जळगाव : शहरातील मोहाडी रोडवर असलेल्या नेहरू नगरात एका अपार्टमेंटच्या पार्किंग झोनमध्ये मध्यरात्री दोन दुचाकींना पेट्रोल टाकून जाळण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पेट्रोल टाकून लावली आग
शाम रामचंद नथाणी (61) हे मोहाडी रोड एक्झोटीका अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 304 मध्ये कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. अपार्टमेंटच्या खाली पार्किंगमध्ये त्यांच्या मालकीची पॅशन प्रो (एम.एच.19 बी.ए.1987) यासह टीव्हीएस स्कुटी (एम.एच.19 एक्स.631) अशी दोन वाहने त्यांनी रविवार, 26 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता पार्किंगमध्ये लावली होती. त्यानंतर कुटुंबिय झोपले होते. मध्यरात्री अज्ञात भामट्यांनी दोन दुचाकींवर पेट्रोल टाकून दोन्ही दुचाकी पेटवून दिले. हा प्रकार काहींच्या पहाटे तीन वाजेच्या सुमारास लक्षात आला. तोपर्यंत दोन्ही वाहने जळून खाक झाली. शाम नाथाणी यांच्या तक्रारीवरुन सोमवार, 27 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता एमआयडीसी पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक नितीन पाटीत करीत आहेत.




