अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत महिला गंभीर


जळगाव : अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने 45 वर्षीय महिला जखमी झाली. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात वाहनाने दिली धडक
गंगाबाई श्याम मोरे (45, रा.खंडेराव नगर, जळगाव) या सोमवार, 26 रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घराकडून विद्यूत कॉलनी परीसरात पायी जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणी जखमी महिलेचा मुलगा योगेश श्याम मोरे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पालिीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक विनोद सोनवणे करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !