झेडआरयुसीसी समिती सदस्यपदी परीक्षीत बर्‍हाटे


भुसावळ : क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती (झेडआरयुसीसी) सदस्य पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भुसावळातील परीक्षीत बर्‍हाटे विजयी झाले. बर्‍हाटे यांना 17 तर प्रतिस्पर्धी महेंद्र बुरड (मलकापूर) यांना 9 मते मिळाली. आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच मतदान पध्दतीने उमेदवार निवड भुसावळ डीआरएम कार्यालयात करण्यात आली.

चार उमेदवार रींगणात
या समितीसाठी निवडणूक रींगणात विनायक पाटील (जळगाव), संजय पवार (चाळीसगाव), महेंद्र बुरड (मलकापूर) आणि परीक्षीत बर्‍हाटे (भुसावळ) होते. पाटील व पवार यांनी मतदान प्रक्रीयेतून माघार घेतली. मिटींग हॉलमध्ये झालेल्या मतदानासाठी चिठ्यांद्वारे मतदान घेण्यात आले. दुपारी 12.30 ते 1 वाजेच्या दरम्या झालेल्या मतदानात परीक्षीत बर्‍हाटे यांना 17 तर त्यांचे प्रतिस्पर्धी महेंद्र बुरड यांना 9 मते मिळाली. डीआरएम तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.केडीया यांनी या निवडणूकीत बर्‍हाटे विजयी झाल्याचे जाहीर केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !