शेतकर्‍याला मारहाण करीत 50 हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने लुटले


जळगाव : केळीचे पैसे घेवून घरी परतणार्‍या भोकर-भादली येथील शेतकर्‍याला अज्ञात पाच हल्लेखोरांना बेदम मारहाण करून 50 हजारांच्या रोकडसह सोन्याचे ब्रेसलेट आणि अंगठी जबरी हिसकावून पोबारा केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी भोकर-किनोद रस्त्यावर घडली. जखमी शेतकर्‍यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. निवृत्ती गंगाराम साळुंखे (37, रा. भोकर भादली, ता.जळगाव) असे जखमी झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

अज्ञात पाच जणांना शेतकर्‍याला लुटले
निवृत्ती गंगाराम साळुंखे या शेतकर्‍याने शेतातील केळी तालुक्यातील किनोद येथील व्यापार्‍याला विक्री केली होती. त्याचे पैसे घेण्यासाठी निवृत्ती साळुंखे हे दुचाकीने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता किनोद येथे गेले होते. व्यापार्‍याकडून 50 हजार रूपयांची रोकड घेवून ते दुचाकीवरून भोकर-भादली येथे परतत असताना त्यांच्यासोबत गावातील विठू उर्फ प्रकाश (पुर्ण नाव माहित नाही) हे देखील होते. भोकर ते किनोद रस्त्यावर अज्ञात पाच जणांनी निवृत्ती यांची दुचाकी अडविली. निवृत्ती यांच्याकडे पैश्यांची मागणी केली असता त्यांच्यात बाचाबाची झाली. यात हल्ले खोरातील एकाने हातातील काठी निवृत्ती यांच्या डोक्याला मारली त्यात ते जखमी झाले. त्यांच्या खिश्यातील 50 हजाराची रोकड आणि गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि 10 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा मुद्देमाल जबरी हिसकावून लुटारूंनी पोबारा केला.





जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
जखमी अवस्थेत निवृत्ती यांनी त्यांचे चुलत भाऊ विजय गोपाल पाटील यांना फोनकरून घटनेची माहिती दिली. विजय पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमी निवृत्ती पाटील यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !