मुक्ताईनगरात खळबळ : कोरोनाचे एकाचवेळी तीन रुग्ण आढळले
मुक्ताईनगर : शहरातील शनिमंदिर परीसरातील रहिवासी असलेल्या तिघांची गुरूवारी कोरोना अॅन्टीजन चाचणी पॉझीटीव्ह आल्याने या परीसरात खळबळ उडाली आहे. कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांना तातडीने जळगाव येथे उपचारार्थ पाठविण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे यांनी दिली. शनिमंदीर परीसरात आरोग्य कर्मचारी पाठवून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे शिवाय बाधीतांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू करण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अमितकुमार घडेकर यांनी सांगितले.


