भुसावळात उघड्यावर कुडकुडणार्यांना दिली मायेची ऊब
ललवाणी फौंडेशन परीवार व सखी श्रावणी महिला संस्थेचा उपक्रम
भुसावळ : स्व.स्वप्निल ललवाणी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ललवाणी परीवार व सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे रस्त्यावर बसेरा करणार्या गोर-गरीब, गरजूंना कांबळ वाटप करून मायेची ऊब देण्यात आली. शहरातील कडाक्याच्या थंडीपासून त्यांचा होण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
बाजारपेठ पोलिस स्टेशनपासून सुरूवात
भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्याहस्ते उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, सातारा ब्रिज, मॉडर्न रोड ते रेल्वे स्टेशनपर्यंत रस्त्याने उघड्यावर झोपलेल्या गरजूंना कांबळ वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी शोभा ललवाणी, निता छेडा, नितीन छेडा, भरत कोळी, फाल्गुनी कोळी, सुनील हेडा, उमेश नेवे, प्रा.डॉ.दिलीप ललवाणी, ललवानी फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्या, सखी श्रावणी महिला संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे, माया चौधरी, वंदना झांबरे, पत्रकार उज्वला बागुल, अनुराधा टाक, आराधना टाक, अनिता कोळी, कल्पना बुंदले, चारू महाजन, भाग्यश्री नेवे, कल्पना नेवे यांच्यासह सदस्या सहभागी झाल्या होत्या.


