भुसावळात रेल्वेखाली आल्याने रोजंदारी मजुराचा मृत्यू


भुसावळ : मध्य प्रदेशातील भिकनगाव येथील रहिवासी असलेला व हल्ली भुसावळ येथे वास्तव्यास असलेल्या रोजंदारी मजुराचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. बिरसिंग सुकलाल जमरा (35) असे मयताचे नाव आहे. . बुधवारी पहाटे पाच वाजेपूर्वी रेल्वे ट्रॅक जवळून जाताना ते रेल्वे गाडीखाली आल्याने ही घटना घडली. शहरातील दत्त नगरातील काशी विश्वेश्वर मंदिराजवळील रहिवासी तथा रेल्वेचे ठेकेदार प्रेमराज मीणा यांच्याकडे जमरा हा कामाला होता. बुधवारी पहाटे पाच वाजेपूर्वी त्याचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !