नशिराबादमध्ये ट्रक चालकाला लुटले : भुसावळातील आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


भुसावळ : नशिराबाद येथे थांबलेल्या ट्रक चालकाला लुटण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ट्रक चालक थांबता असताना काही संशयीतांनी आठ हजारांची रोकड व मोबाईल लांबवला होता. या गुन्ह्यातील मोबाईल भुसावळातील संशयीताकडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. अक्षय शामकांत कुलकर्णी (24, रा.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून सहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीला अधिक कारवाईसाठी नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, हवालदार संदीप सावळे, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक किशोर राठोड, नाईक रणजीत जाधव, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, चालक हवालदार भरत पाटील आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !