चोपड्यात दोन गटात हाणामारी : पाच संशयीतांना अटक


चोपडा : शहरातील दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे.

किरकोळ कारणावरून हाणामारी
शहरातील साने गुरुजी वसाहतीजवळ दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यातील पहिल्या फिर्यादीनुसार गुरुवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गुलाम रसूल मोमीन याने मित्रांसह शहरातील साने गुरुजी वसाहतजवळ आकाश भोई यास रस्त्यावर अडवून शिवीगाळ करत मारहाण केली. गुलाम रसुल मोमीन याने दगडाने भोई यास मारहाण केली. याप्रकरणी आकाश भोई याच्या फिर्यादीवरून आरबाज पठाण, कलीम हलवाई, शाबीर हलवाई, गुलाम रसुल मोमीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दुसर्‍या गटाचीही फिर्याद
दुसर्‍या गटाच्या फिर्यादीनुसार गुलाम रसुल मस्तान मोमीन हा बुधवार, 29 रोजी दुपारी घरी जात असताना, साने गुरुजी वसाहतीकडील सार्वजनिक शौचालयासमोर आकाश भोई याने, गुलाम मोमीन याला धमकावत मारहाण केली तर आकाश भोई याने मोमीनच्या गळ्यावर चाकूने वार करुन दुखापत केली. याप्रकरणी गुलाम रसुल मस्तान मोमीन याच्या फिर्यादीवरून शिवाजी भोई, आकाश भोई यांच्याविरोधात चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिवाजी भोई, आकाश भोई, अरबाज पठाण, शाबीर हलवाई, कलीम शेख हलवाई यांना पोलिसांनी अटक केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !