आमदार नितेश राणेंना आणून देणार्‍याला कोंबडी बक्षीस !

मुंबईतील बॅनरबाजीची सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल


मुंबई : भाजपाचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या असतानाच मुंबईत आता नितेश राणे (MLA Nitesh Rane) हरवले असून त्यांना आणून देणार्‍यास कोंबडी बक्षीस , अशी बॅनरबाजी करण्यात आल्यानंतर ती चांगली चर्चेत आली आहे. दरम्यान, शिवसैनिक हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी तिसर्‍या दिवशी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी फेटाळला असून राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे तर गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.

हे बॅनर ठरतेय चर्चेचे कारण
मुंबईतील चर्चगेट या स्थानकाबाहेर नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्या फोटोसह एक बॅनर लावण्यात आले असून त्यावर नितेश राणे हरवले असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याबद्दल माहिती देणार्‍यास एक कोंबडी बक्षीस म्हणून देण्यात येईल, असेही बॅनरवर नमूद करण्यात आलंय. दरम्यान, हे बॅनर कोणी लावले याबद्दल मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


परब यांच्यावर झाला होता हल्ला
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी खुनी हल्ला झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत एकूण सहा संशयिताना अटक केली आहे. यामध्ये स्वाभिमानचे पुणे येथील कार्यकर्ते सचिन सातपुते यांना अटक केल्यानंतर पोलिसांची चक्रे आमदार राणे व सावंत यांच्या दिशेने फिरली होती. त्यामुळे या दोघांनी 27 डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

मोबाईल हस्तगत करणे गरजेचे
या प्रकरणात वापरण्यात आलेले मोबाईल हस्तगत करणे आवश्यक आहे, तसेच याची खास चौकशी होणे आवश्यक आहे त्यामुळे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) आणि संदेश सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !