भरधाव पिकअपची धडक : 21 वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार


शिरपूर : शहरातून निमझरी जाणार्‍या रस्त्यावर इंजिनिअरिंग कॉलेज पाठिमागे शनिवारी दुपारी पिकअप वाहने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तालुक्यातील टेंभेपाडा येथील 21 वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला. चंदू उदयसिंग पावरा (21, रा.टेंभेपाडा) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दखल
शनिवार, 31 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वरझडी रस्त्यावर दुचाकी (एम.पी.46 एम.सी.6071) ला पिकअप (एम.एच. 18 ए.ए.6613) या क्रमांकाच्या वाहनाने समोरून धडक जोरदार दिल्याने अपघात होवून दुचाकीस्वार चंदू उदयसिंग पावरा हा गंभीर जखमी झााला. जखमीला त्याचे वडील उदयसिंग नमला पावरा यांनी साडे तीन वाजेच्या सुमारास जखमी अवस्थेत 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ.गुलाबराव पाटील यांनी तपासणी करून चंदू पावरा यास मयत घोषित केले. घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यावरून नाईक रुपेश गांगुर्डे व मुकेश पावरा यांनी घटनास्थळ दाखल होत वरून पिकअप व दुचाकी वाहन ताब्यात घेतले. या प्रकरणी वॉर्डबॉय नितेश गवळी यांच्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास नाईक रुपेश गांगुर्डे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !