भादलीतील 35 वर्षीय तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या


जळगाव : जळगाव तालुक्यातील भादली येथील 35 वर्षीय तरुणाने रविवार, 2 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केली. नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भागवत अशोक फेगडे ( 35, रा. भादली) असे मृत तरुणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
जळगाव तालुक्यातील भादली येथील भागवत फेगडे हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होत. रविवार, 2 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बाहेर जाऊन येतो, असे सांगून ते बाहेर पडले व भादली रेल्वेस्थानक परीसरात धावत्या रेल्वेसमोर झोकुन देत आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !